Sunday, June 26, 2022
|| श्री ||

गोडबोले स्टोअर्स


श्री दिनकर गणेश गोडबोले (अण्णा) यांनी १९५६ साली दुकानाची स्थापना केली. गोडबोले क्लीनर्स नावाने सुरु केलेली laundry श्री. दिनकर गोडबोले व सौ. सुमती गोडबोले यांच्या अथक परिश्रमांमुळे वर्षभरातच चांगली चालावयास लागली. गोडबोले जोडप्याने laundry व्यवसायात चांगला जम बसवला. त्या काळी ब्राम्हण जोडप्याने 'कपडे धुवून देणाऱ्या' व्यवसायात केलेली प्रगती ह्यामुळे चर्चेचा विषय झालेला होता. प्रचंड मेहेनत व आपल्या व्यवसायावर असलेलं नितांत प्रेम ह्यामुळे गोडबोलेंनी प्रचंड पैसा कमावला. पण १९७८ साली इस्त्रीवाल्या भैय्यांनी केलेल्या संपामुळे तसेच लेबर कोर्टात केस हरल्यामुळे गोडबोलेंनी laundry व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. तो पर्यंत त्यांच्या मोठ्या कन्येचे लग्न झालेलं होत व दोन मुलं शिकत होती. दुकान बंद झालं आता पुढे काय ? . . . . . . . . . .

सौ. सुमती दिनकर गोडबोले, पूर्वाश्रमीची अंबू चितळे, राहणार पाग, चिपळूण. श्री. बाजाप्पा चितळे, दशग्रंथी ब्राम्हण, ह्यांची कन्या सौ. रमाबाई चितळे ह्यांनी आपल्या मुलीला पाककृतीत पारंगत केलेलं होतं. आईच्या आशीर्वादामुळे सौ सुमती गोडबोले यांचा प्रत्येक पदार्थ हा उत्कृष्टच होत असे. हे पाक कौशल्य त्यांना व्यवसायात उपयोगी पडेल ह्याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.

गोडबोले क्लीनर्स बंद झाल्यावर अण्णांना असा व्यवसाय करायचा होता जो दुसऱ्यावर अवलंबून न राहता करता येईल व त्यातूनच सौ. गोडबोलेंच्या गोडबोले स्टोअर्स चा जन्म झाला. कल्पना व पाक कौशल्य ह्यामुळे ५ पदार्थांनी चालू केलेलं दुकान वर्षभरात १०० पदार्थांवर पोहोचलं. सौ. सुमती गोडबोले ह्यांच्या अफाट कर्तृत्व व मेहेनतीच्या जोरावर त्यांनी आपल्या रायगड जिल्ह्यात असलेल्या 'कशेणे' गावी चक्क घरगुती पदार्थांचा कारखाना टाकला. पण १९९४ साली कुठलाही आजार झालेला नसताना श्री दिनकर गणेश गोडबोले यांना देवाज्ञा झाली.

सौ गोडबोलेंचा मुलगा सचिन दिनकर गोडबोले हा M' com होऊन essaye -terooka ह्या जपानी कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता.वडिलांच्या निधनानंतर व आईच्या शब्दाला मान देऊन सचिनने नोकरी सोडून दुकान चालवण्याचा निर्णय घेतला.

सचिनने दुकान ताब्यात घेतल्या बरोब्बर दुकान अद्ययावत करून घेतलं. मुंबईमधील घरगुती पदार्थ विकणाऱ्या मराठी माणसाचे 'वातानुकुलीत' दुकान झालं. दुकानात कॉम्प्युटर, बारकोड, स्कॅनर अशी अद्ययावत उपकरणे आली. सचिन कायम 'जमाने के साथ चलो ' ह्या उक्तीला धरून वागला. त्याने दुकानात diet फूड चालू केले. परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी instant फूड चे अर्थात तयार उत्पादनांचे उत्पादन चालू केले. अमेरिकेतील खाद्य प्राधिकरणाची परवानगी मिळवून अमेरिकेतील नातेवाईकांसाठी 'दिवाळी फराळ hamper ची त्यांची कल्पना तर अफाट लोकप्रिय झाली. फराळा सहित कंदील , उटण्याचा साबण पणत्या व रांगोळी स्टीकर पाठवून त्याने हजारो भारतीयांची मन जिंकली . भारतात असलेल्या असंख्य मातांनी जगभरातील आपल्या लाडक्यांपर्यंत स्वतः बनविलेला फराळ त्यांच्या लाडक्यांपर्यंत पोहोचवून आशीर्वाद मिळवला.

'दिवाळी फराळ hamper' चा जनक म्हणून सचिन गोडबोलेच्या नावाची नोंद झालेली आहे. त्याला 'शिवगौरव' पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आले.


सचिन गोडबोले M ' com
दादर वाशी व न्यू जर्सी येथे दुकाने
शिवगौरव पुरस्कार विजेता
' दिवाळी फराळ hamper' चे जनक
२००९ साली फिलाडेल्फिया येथे झालेल्या BMM च्या अधिवेशनात आपल्या पदार्थांच्या चवीमुळे वाहवा मिळवली
२००९ साली दिवाळीत 'मराठी विश्व ' च्या दिवाळी कार्यक्रमात त्यांच्या ६०० सभासदांना फराळ पाठविला व सर्वांनाच पदार्थ आवडल्याचे इमेल द्वारे कळले.
२००९ साली देलावर महाराष्ट्र मंडळानेही सचिनला फराळाची ऑर्डर दिली. उत्कृष्ट व वेळेवर पोहोचल्यामुळे मंडळाच्या अध्यक्षांनी सचिनचे कौतुक केले.

     
 
Home Shopping Cart About Us Contact Us Home